स्त्री-मुक्ती असावी, पण त्यात आपली बायको, सून, मुलगी, बहीण नसावी!
समाजाचा एक घटक या नात्यानं आपला विकास हा सामाजिक विकासावर अवलंबून आहे. सावित्रीबाई, रमाई, फातिमाबाई यांचा वारसा आपल्यासमोर आहे. तसंच सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. तेव्हा ‘शिवाजी जन्मावा, पण तो शेजारच्या घरात’ किंवा ‘स्त्री-मुक्ती असावी, पण त्यात माझी बायको, सून, मुलगी, बहीण नसावी’, असा उपटसुंभ विचार करून कसं चालेल?.......